नवी दिल्ली | गत काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Prices Hike) किंमती स्थिर होत्या. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल महागण्याचा अंदाज आता खरा ठरत आहे.
साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. मंगळवारी पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ झाली होती.
मंगळवारप्रमाणंच बुधवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल 80 पैसे तर मुंबईमध्ये पेट्रोल 85 पैसे महागले आहे. तर डिझेलचे दर 80 पैसे महागले आहेत.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. पण गत काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर देखील अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती.
पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अगदी तसंच होत असल्याचं सध्या तरी चित्र आहे.
देशात काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर क्रूड ऑईलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”
Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा
चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण
Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र
Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”