केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार

नवी दिल्ली | केंद्र सरकार कर्माचाऱ्यांना महागाई भत्ता आणि घरभत्ता देत असतं. सरकारी कर्माचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

सरकारी कर्मचारी गेल्या वर्षभरापासून सरकारकडं महागाई भत्त्याची मागणी करत आहेत. अशातच आता सरकार महागाई भत्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सरकार सध्या कर्मचाऱ्यांना एकवेळीच गेल्या 18 महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचा विचार करत आहे. सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये सध्या चर्चा चालू आहे.

जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचा महागाई भत्ता देण्याबाबत सरकार हा पर्याय अवलंबण्याची शक्यता आहे. परिणामी असं झाल्यास कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

कर्मचाऱ्यांना डीए एरिअर देण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेण्याची सध्या सर्वजण वाट पाहात आहेत. अशा परिस्थितीत सरकार लवकर निर्णय घेईल असं कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

सध्या देशात पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. अशा परिस्थितीत सरकार निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतला तर त्याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालय आणि कामगार कल्याण मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा मुद्दा निकालात काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी एकवेेळीच 18 महिन्यांचा महागाई भत्ता देण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनूसार त्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. 11 हजार 880 रूपयांपासून ते 2 लाख 18 हजार 200 रूपयांपर्यंत हा भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 “तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी