“राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद”

वर्धा : राज्याचे उर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांपुरताच मर्यादित आहे आणि  अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद असल्याचं सांगत त्यांनी टीका केली आहे.

काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेतृत्व कोणी करावं?, याबाबत एक-एक महिना निर्णय होत नाही. ज्या पक्षाला अध्यक्षच नाही त्या पक्षाची हीच अवस्था होणार, असा टोला लगावला आहे.

काँग्रेसला अध्यक्षच नसल्याने मोठ्या नेत्यांपासून ते गावातील कार्यकर्तेही काँग्रेस सोडून सेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. मोदी देशाला सर्वोत्कृष्टपणे पुढे नेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाईट दिवसातही राज्याला चांगलं ठेवण्याचं काम केलं, असं म्हणत बावनकुळेंनी मोदी आणि फडणवीसांच्या कामांचं कौतुक केलं आहे.

बाळासाहेब थोरात हे नवे प्रदेशाध्य आहेत. त्यांनी पक्ष अडचणीत आहे हे माहित आहे. पक्षाला धोरण नाही, नेता नाही, नेतृत्वा नाही, कार्यकर्त्ये नेतृत्वहीन झाले आहेत. ते युद्ध कसे लढणार? ज्या पक्षाला नेता नाही तो पक्ष हरणारच. हा इतिहास आहे, अशी टीकाही बावनकुळेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर???

-“खासदार आझम खान यांचे शीर कापून संसदेवर लटकवा”

-“साहेबांच्या हृदयाचे किती तुकडे होत असतील याचा अहिरांनी विचार केला का?”

-इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट- असदुद्दीन ओवैसी

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेतासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर अजित पवार म्हणतात…