“त्यावेळी त्यांनी माझं नाव माझ्या भावाशी जोडलं”, रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा

मुंबई | बॉलिवूड कलाकार त्यांचं वैयक्तिक आयुष्य शक्य तितकं लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवतात. पण काही वेळा त्यांच्या गोपनीयतेचा वेगळाच अर्थ लावला जातो. अशीच एक घटना अभिनेत्री रवीना टंडन हिच्यासोबत घडली होती.

रवीनाने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या या घटनेची माहिती दिली आहे. आमचा एक को -स्टार होता. मी त्याच्यासोबत मित्रासारखं वागायचे. मात्र काही मॅग्झीनच्या पत्रकारांना हे मान्य नव्हतं, असं रवीना म्हणाली.

त्यावेळी पत्रकारांच्या कृपेवर कलाकार पुढे जात असत. आता परिस्थिती वेगळी आहे. मला आठवतंय की, काही लोकांनी मला माझ्याच भावाशी रिलेशनशिपच्या नात्यात जोडलं होतं, असं रवीनाने सांगितलं आहे.

एक देखणा आणि गोरा मुलगा रवीनाला सोडायला जातो, आम्ही रवीना टंडनच्या प्रियकराचा शोध घेतला आहे, असं काही लोकं बोलायचे. तेच छापून येत होतं.

आमच्यासाठी ती खूप वाईट अवस्था होती, त्यांचं स्पष्टीकरण कोण आणि किती देईल, असं म्हणत रवीना भावूक झाली. मला आठवतं, मी वाट पाहत अनेक रात्री घालवल्या होत्या, असंही रवीनाने सांगितलं आहे.

दर महिन्याला एक बातमी येत होती. माझी विश्वासार्हता, माझा आदर, माझे आई-वडील तुटले होते. मला वाटायचं की हे सर्व काये, असंही रवीना म्हणाली.

दरम्यान, त्यावेळी आम्ही खूप तणावात होतो. आमच्यासाठी ते वाईट दिवस होते. आता काळ बदलला आहे, असंही रवीना म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

Omicron: सर्दी-खोकल्याला हलक्यात घेऊ नका; ‘ही’ वेगळी लक्षणं दिसल्यास लगेच डाॅक्टरांकडे जा

‘मला मारलं बिरलं तर लफडं होईल म्हणून…’; आव्हाड आक्रमक

  लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक