आरोग्यमंत्र्यानी बुस्टर डोसविषयी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…

मुंबई | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं सगळीकडे खळबळ माजवली आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात चिंतेचे वातावरण झाले आहे.

कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र लसीकरण होईनही अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनानं महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमावर राज्यात कोरोना आढावा बैठक पार पाडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि बाकी नेेतेमंडळींनी हजेरी लावली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला.

लसीकरण झालेले असूनही नागरिकांना कोरोनाची आणि ओमिक्राॅनची बाधा होत असल्याचं चित्र आहेे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात बुस्टर डोस (Booster Dose) देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सनं लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. मात्र रुग्णसंख्या वाढतच राहिली तर तिसरी लाट येण्याती शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास राज्यात लाॅकडाऊन करण्याची गरज नाही, असं बैठकीत सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच देशात दाखल झालेल्या ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. पुण्यात तर ओमिक्राॅनचे सक्रिय रुग्णांध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 653 आणि दिल्लीत 464 रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनवरील 2,135 रुग्णांपैकी 828 बरे झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

 ‘मला मारलं बिरलं तर लफडं होईल म्हणून…’; आव्हाड आक्रमक

  लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक

माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे