Omicron: सर्दी-खोकल्याला हलक्यात घेऊ नका; ‘ही’ वेगळी लक्षणं दिसल्यास लगेच डाॅक्टरांकडे जा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी रूग्णालयात गर्दी वाढताना दिसतीये. अशातच सरकार देखील सतर्क झालीये.

देशभरात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 58,097 इतकी आहे. त्यामुळे आता सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जगभरात हाहाकार माजवल्यानंतर ओमिक्रॉनचा भारतातही सातत्यानं प्रसार होतोय.

भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या सुमारे आता 1900 वर गेली आहे. घसा खवखवणे, खोकला-सर्दीशिवाय फक्त घसा खवखवणे, अशी लक्षणं दिसू लागली तर तात्काळ डाॅक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळं आणि हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं सामान्य आहे. बदलत्या ऋतूमध्ये कोणत्या थंडीमुळे अनेकजण आजारी असल्याचं दिसतं.

परंतु अलीकडेच तज्ज्ञांनी दावा केला आहे की, नाकातून वाहणं हे देखील ओमिक्रॉनचं लक्षण असू शकतं. नाक वाहणे, शिंका येणे आणि घसा खवखवणं यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची बहुतांश प्रकरणं नोंदवली जात आहेत.

पाठीच्या खालच्या भागात दुखणं, स्नायू दुखणं आणि रात्री घाम येणं हे देखील ओमिक्रॉनचे मुख्य लक्ष्य आहेत. अनेक संशोधने असं दर्शवतात की कोरोनाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत ओमिक्रॉन खूपच सौम्य आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मला मारलं बिरलं तर लफडं होईल म्हणून…’; आव्हाड आक्रमक

  लसीचा दुसरा डोस घ्या नाहीतर क्वारंटाईन व्हा, राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

‘पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा…’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

‘तुमच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला पण…’; तेजस्विनी पंडित भावूक

माझ्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतोय, तुम्ही…- उद्धव ठाकरे