मुंबई | बॉलिवूडची सुपरस्टार जोडी विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. विकी आणि कतरीनाच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले आहे.
या दोन्ही नवविवाहीत जोडप्यांची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असते. लग्नानंतर विकी कौशल पुन्हा एकदा त्याच्या कामावर परतला आहे.
इंदोरमध्ये त्याच्या पुढच्या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. दरम्यान, विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकीच्या जुन्या मित्राने त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
हा व्हिडिओ सुमारे 13 वर्षे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये विकी खूपच सडपातळ दिसत आहे आणि त्यानं निळ्या रंगाच्या शर्टसोबत गमछा देखील घातला आहे.
कोणत्या तरी काॅमेडी नाटकाचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिरीन मिर्झाही त्याच्यासोबत परफॉर्म करताना दिसत आहे.
शिरीन मिर्झाने व्हिडिओ यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट केली आहे. शिरीन मिर्झाने ‘अभिनय शाळेचे दिवस’, असं कॅप्शन या व्हिडीओला लिहिलं आहे.
विकीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. ‘अभिनयाचे चांगले दिवस (2009)’, असं लिहिलंय आहे.
दरम्यान,विकीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. आणि सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
तरूणांसाठी पोस्टाची भन्नाट योजना; मिळणार तब्बल 35 लाख रूपये
‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू!
“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”
“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”
‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला