Bigg Boss मध्ये राडा! बिचुकलेला राग अनावर, दगड उचलून मारायला धावला अन्…

मुंबई | बिग बॉस 15 च्या फायनलला आता फक्त दोन आठवडे उरले आहेत. या आठवड्यात घरामध्ये फायनलसाठीच्या लढत होताना दिसत आहेत. फायनलच्या तिकीटासाठी कुटुंबातील उर्वरित सदस्य जीव मुठीत धरून आहेत.

अशातच आता बिग बाॅसच्या घरात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे. कलर्सने आपल्या इंस्टाग्रामवर आगामी भागाचा प्रोमो जारी केला आहे.

ज्यामध्ये अभिजीत, देवोलिना आणि तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण होत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की तेजस्वी आणि अभिजीत आपापल्या बास्केटमध्ये चेंडू भरताना दिसत आहे.

अभिजीत तेजस्वीचा चेंडू हिसकावून घेण्यास सुरुवात करतो. या बाचाबाचीत तेजस्विनी आणि अभिजीतमध्ये बाचाबाची होऊन धडकून पडले. त्यानंतर रागाच्या भरात तेजस्वीने बॉल ओढून अभिजीतला फेकून मारला.

यानंतर देवो अभिजीतच्या बास्केटमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न करते आणि या प्रयत्नात ती अभिजीतच्या हातावर चावा घेते. देवोला चावल्यानंतर अभिजीतला राग येतो.

दार उघड आणि बाहेर काढ असं बिचुकले म्हणतो. यानंतरही अभिजीतचा राग शांत होत नसल्यानं तो दगड उचलून देवोलीनाला मारण्यासाठी धावतो.

दरम्यान, या तिघांमध्ये झालेल्या भांडणात पुढं काय होतंय हे पाहण्याजोगं आहे. त्यामुळे आता बिग बाॅसमध्ये चांगलीच लढत होणार असल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


महत्त्वाच्या बातम्या – 

“येत्या काळात आम्ही त्यांना पुरून उरू, भाजपच ‘नंबर 1’चा पक्ष”

‘आज आबांची खूप आठवण येतेय’; रोहित पाटील भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!