KING is Back! तब्बल 4 महिन्यानंतर शाहरूख खानचं पुनरागमन

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर (Aryan Khan Case) बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खळबळ उडाल्याचं पहायला मिळत होतं. हा वाद चांगलाच पेटल्याचं पहायला मिळालं होतं.

एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरूख खान सगळं सोडून आपल्या लेकाला वाचवण्याच्या प्रयत्न करत होता.

अशातच शाहरूखच्या अनेक फिल्मस देखील थांबवण्यात आल्या होता. त्यावेळी शाहरूख सोशल मीडियावरून देखील गायब झाल्याचं पहायला मिळालं होतं.

त्यातच आता शाहरुख खान तब्बल 4 महिन्यांनंतर सोशल मीडियावर परतला आहे. शाहरुख खानने नुकताच पत्नी गौरी खानसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शाहरुख खानची नवीन पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही प्रमोशनल पोस्ट असली तरी चाहते शाहरुखला पुन्हा एकदा धमाकेदार असल्याचं म्हणत आहेत.

शाहरूखने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये LG च्या टीव्हीचं प्रमोशन करण्यात आलं आहे. शाहरूख एलजी टीव्हीचा ब्रँड अम्बेसिटर आहे. असं असलं तरी तब्बल 4 महिन्यांनंतर शाहरूखची नवी पोस्ट पहायला मिळाली आहे.

दरम्यान, शाहरूखच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी किंग इस बॅक अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तर अनेकांनी वेलकम बॅक म्हणत शाहरूखचं पुन्हा स्वागत केलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाही दिसतात Omicronची ही 5 लक्षणं; वेळीच व्हा सावध

 एका आयटम साॅंगसाठी नोरा घेते तब्बल ‘इतकं’ मानधन; आकडा ऐकून व्हाल थक्क

सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘या’ कारणामुळे सोडणार टेनिसचं कोर्ट

अखेर डुग्गू सापडला! बेपत्ता स्वर्णव सापडल्यानं आई-वडिल भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी