देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ, म्हणाले…

मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारी कारवाई आज ईडीनं केली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात मोठा गोंधळ उडाल्याचं दिसतंय.

नवाब मलिक यांच्यावर ईडीनं दाऊद इब्राहिमसोबत मालमत्ता व्यवहार केल्याचा आरोप लावला आहे. चौकशीदरम्यान दाऊद आणि मलिक यांच्यात मनी लाॅड्रिंग प्रकरण समोर आल्याचंही ईडीनं म्हटलं आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मलिक यांना अटक करण्यात आल्याचं ईडीने आहे. मलिक यांना अटक केल्यानंतर आता राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाद रंगला आहे.

महाविकास आघाडीकडून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याची टीका केली आहे. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचं कारण काय?, जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

ज्यांची मालकी त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही. जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा साक्ष दिली आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार कसे खोटे पुरावे, साक्षी गोळा करतात, यासंदर्भात येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली आहे.

कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवं, असंही ते म्हणालेत.

देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचं कारण काय?, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची साक्ष ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीस यांच्या या टीकेनंतर राज्यात नवा वाद उद्भवला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक