“शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर यायला लागला आहे. अंतर्गत असलेले मतभेद आता हळूहळू समोर यायला लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचं पहायला मिळत आहे. यावरुनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाईचा सपाटा लावला असून वातावरण चांगलंच गरम झालं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवर वक्तव्य केलं आहे. मला तर भीती वाटते, आमच्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल, अशा खोचक शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

तरही राज्यात राज्यपाल आहेत, इतरही राज्यात ईडीचे कार्यालय आहेत. मात्र तिथे असं होत नाही. फक्त महाराष्ट्र बंगालमध्ये असं होतं याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असं राऊत म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणा सूडाच्या भावनेने तपास आणि कारवाई करत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा गृह विभाग किंवा महाराष्ट्र सरकार कधीच करणार नाही, असंही राऊत म्हणाले.

ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तेथील सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने सुडाची कारवाई करत आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ! 

“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता” 

अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले…