“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”

बीड | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचं पहायला मिळत आहे. यावरुनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर यायला लागला आहे. अंतर्गत असलेले मतभेद आता हळूहळू समोर यायला लागले आहेत.

राजकीय वर्तुळातील वातावरण पेटलेलं असताना अशातच आता शिवसेना राष्ट्रवादीची जुंपलेली पहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.

तुम्हाला आम्ही डिस्टर्ब करत नाहीत, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका, दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही, असं शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलं आहे.

बीडमधील शिवसंपर्क अभियानासंदर्भात बोलताना निंबाळकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण पुन्हा एकदा पेटल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाईचा सपाटा लावला असून वातावरण चांगलंच गरम झालं आहे.

इतरही राज्यात ईडीचे कार्यालय आहेत. मात्र तिथे असं होत नाही. फक्त महाराष्ट्र बंगालमध्ये असं होतं याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असं राऊत म्हणाले.

राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये या कारवाईची जोरदार चर्चा असतानाच शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  यंदाच्या पावसाळ्याविषयी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

  पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…

करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ! 

“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता” 

अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले…