भयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत होती झाडू, पाहा व्हिडीओ

मुंबई| अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, आज 17 मे दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं.

मुंबई आणि किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. समुद्रानं रौद्र रुप धारण केलेलं पाहायला मिळतंय. एकूणच समुद्राच्या लाटा उंच उसळत आहेत. समुद्र किनाऱ्यांपासून लांब तसेच घरातच राहण्याचं आवाहान प्रशासन आणि हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.

या वादळामुळे पुढील 12 तास हे अधिक धोक्याचे ठरणार आहे. सोशल मीडियावर #CycloneTauktae शी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर केले जात आहे. यामध्ये हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशातच सध्या सोशल मीडियावर एका महिला सफाई कामगाराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या वादळात, भर पावसात रस्त्यावरील साफसफाई करतानाचा हा व्हिडीओ आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, एक महिला पावसात रस्त्यावर कचरा काढत आहे. यादरम्यान महिलेने डोकं पॉलिथिनने कव्हर केलं आहे. डोकं भिजण्यापासून वाचविण्यासाठी तिने हा जुगाड केला आहे. तिच्या आजू-बाजूने गाड्या जात आहेत. महिला मात्र भिजत असताना आपलं काम करीत आहे. महिला कसलाही विचार न करता अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करताना दिसत आहे.

या व्हिडीओवर महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हा व्हिडीओ आनंद महिद्रांनी रिशेअर केला आहे. या महिलेचे काम प्रेरणादायी आहे. माझी बीएमसीला एक विनंती आहे, की सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट दिलाच असेल, परंतू पुन्हा एकदा त्यांच्याकडे तो आहे की नाही हे एकदा सुनिश्चित करावे.

या महिलेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 84 हजार व्ह्यूवज मिळाले आहेत. 1671 लाईक्स आणि 309 वेळा रिट्विट करण्यात आले आहे. तर आनंद महिंद्रांच्या रिट्विटला 3.8 हजार लाईक्स मिळाले आहेत.

दरम्यान, चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून एकाचा जीवही गेला आहे. मुंबईत वादळाचा वेग हा ताशी 114 किमी एवढा प्रचंड नोंदला गेला आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

घरात जागा नाही म्हणून ‘तो’ चक्क 11 दिवस झाडावर…

लग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

तलावावर पाणी प्यायला आलेल्यावर मगरीने केला हल्ला अन्…,…

चार अंडी चोरणं पोलीस हवालदाराला पडलं महागात, पाहा व्हायरल…

मोबाईल पाहणं तरूणाच्या आलं अंगलट, पाहा व्हायरल व्हिडीओ