“महाविकास आघाडीचा एक-एक कोना ढासळतोय, आता येणाऱ्या काळात…”

पुणे | राज्यात शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.

राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार आहे  त्याचा एक- एक कोना ढासळताना दिसत आहे  राज्याचा गृहमंत्री म्हणजे सुरक्षा असते परंतु, राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना अटक होणे चिंताजनक आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता सिल केल्याची बातमी आहे. येणाऱ्या काळात अनेक गोष्टी घडणार आहेत, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ ब्रिज द्वारे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची तयारी म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडचमधील भाजपचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी ऑडिओ ब्रिज माध्यमातून संवाद साधला.

महाराष्ट्रात 20 मार्च 2020 ला पहिला कोविड रूग्ण सापडला. त्यानंतरच्या दीड वर्षात प्रत्येकाला विविध आव्हानांचा सामना करावा लागला. कोरोना विरूद्धच्या लढाईत नागरिकांचे दोन डोस पुर्ण झाले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मात्र, आजही अनेक कुटूंबाची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. आर्थिदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटूंबियांची भाजपा कार्यकर्त्यांनी मदत करावी, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलताना केलं आहे.

तसेच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केल्या आहेत.

दरम्यान, यावेळी भाजप आमदार महेश लांडगे यांनी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने अंधारातुन प्रकाशाकडे नेणारी आहे. शतकाहून अधिक काळात पाहिले नसलेले संकट बाजुला सारूण आपण प्रकाशाकडे मार्गक्रमण करत आहोत, असं बोलताना महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

तसेच गेल्या वर्षी कोरोना महामारीचे संकट आपल्यावर ओढावले होते. यामध्ये माझे अनेक बांधव, निकटवर्तीय सो़डून गेले. अनेक जण बेरोजगार झाले. परंतु, अंधार बाजुला सारूण आपल्याला पुढे चालायचे आहे, असं महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मग तो एवढा प्रामाणिक कसा? हे तर मोदींच्या वर झालं”

पुढील 3,4 दिवसांत कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, दिवाळीही निघणार तुरुंगात

  “अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय”

  शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला- उद्धव ठाकरे