स्टार्कचा 3 मीटर बॉल पाहून सगळेच थक्क, मॅथ्यू वेड थोडक्यात वाचला; पाहा व्हिडीओ

कॅनबेरा | कोरोना महामारीनंतर क्रिकेट हे हळूवार प्रगती पथावर येत आहे. अशातच, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका सध्या सुरू झाली आहे.

पाच सामन्यातील टी-20 मालिकेचा तिसरा सामना हा कॅनबेरा येथे खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना एक विचित्र प्रकार घडला.

श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना 18 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क ज्यांचा एक चेंडू सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

मिचेल स्टार्क तो त्यांचं वैयक्तिक शेवटचं षटक टाकत होता. स्टार्क त्या षटकातील पाचवा चेंडू टाकत होता. त्याने स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्याचा हा प्रयत्न फसला आणि त्यांच्या हातातून चेंडू निसटला. यष्टीरक्षक मॅथ्यू वेडलाही तो आडवता आला नाही आणि चेंडू सीमारेषा ओलांडून गेला.

या चेंडूवर श्रीलंकेला नो बॉल आणि चौकार गेल्यानं  अतिरिक्त 5 धावा मिळाल्या. यासह नो-बॉलवर फ्री हिट देखील मिळाली.

दसून शनका फलंदाजी करत असताना स्टार्कने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या उंचीपेक्षा खूप वरून गेला. खेळपट्टीपासून सुमारे 3 मीटर उंचीवरून हा चेंडू गेल्याचं नंतर डिजिटल मीटर मध्ये दिसून आलं.

यष्टीरक्षक वेडने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. समालोचकांनाही या चेंडूवर हसू आवरता आलं नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यांत ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा सहज पराभव केला.

ऑस्ट्रेलियानं 122 धावांचे लक्ष तीन षटके बाकी असताना चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गोलंदाजीसाठी हा दिवस चांगला ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सहापैकी चार गोलंदाजांनी बळी घेतले.

पाहा व्हिडीओ-

महत्वाच्या बातम्या – 

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!

“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”

‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले

‘मामी गप्प बसा….’; शिवसेनेच्या ‘या’ महिला नेत्याची अमृता फडणवीसांवर बोचरी टीका