मुंबई |काँग्रेसचे (INC) माजी मंत्री अस्लम शेख हे आता अडचणीत सापडले आहेत. शेख यांना पर्यावरण विभागाची (Environment Department) नोटीस आली आहे. अस्लम शेख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईचे पालक मंत्री (Ex-Guardian Minister of Mumbai) होते.
मुंबईतील मढ (Madh) परिसरातील कमर्शियल फिल्म स्टुडिओ (Commercial Film Studio) प्रकरणात पर्यावरण खात्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या या नोटीसची भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी माहिती दिलीये.
अस्लम शेख यांनी मढ मार्वेच्या फिल्म स्टुडिओत 1000 कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र पर्यावरण खात्याने नोटीस पाठवली आहे. यावेळी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण खात्याने दिले आहेत.
किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मला हा स्टुडिओ तोडण्याची अपेक्षा आहे, असे देखील सोमय्या म्हणतात. त्यामुळे आता बांधकाम विभागातून नोटीस आल्याने शेख अडचणीत आले आहे.
काही दिवसांपूर्वी देखील मुंबईच्या माजी पालक मंत्र्यावर सोमय्या यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. कोरोनाच्या काळात शेख यांनी मालाडजवळच्या समुद्रात सर्व नियम धाब्यावर बसवत बांधकाम केल्याचे आरोप त्यांनी केले होते.
शेख यांनी मढच्या परिसरात तब्बल 28 फिल्म स्टुडिओंचे नियमबाह्य बांधकाम केले आहे. यातील 5 स्टुडिओ हे सीआरझेड झोनमध्ये (CRZ Zone) येत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
या प्रकरणात अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचं सोमय्या म्हणालेत. पर्यावरण खात्याने पाठवलेल्या या नोटीसमध्ये महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा देशात गौरव झाला- भगतसिंह कोश्यारी
कोणत्याही निवडणूका लागल्या की मली बोलवा – अमित ठाकरे
ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का
शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी!