भारतावर टीका करताना पाकिस्तानकडून झाली ‘ही’ मोठी चूक

नवी दिल्ली : पाकिस्तानने जम्मू काश्मीरविषयी असे अनेक दावे केले आहेत ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालावी लागली. मात्र, तरिही पाकिस्तान सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीर प्रकरणात भारताला दोष देणारा दावा करताना चक्क पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केला. तसेच तो फोटो काश्मिरमधील पीडितेचा असल्याचा दावा केला.

पाकिस्तानी माजी उच्चायुक्तांच्या या रिट्विटनंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. त्यांनी केलेल्या रिट्विटमध्ये म्हटले होते, “काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय सैन्याने केलेल्या पेलेटगनच्या हल्ल्यात युसुफ नावाच्या व्यक्तीची दृष्टी गेली आहे. त्याच्याविरोधात उभं राहा.”

अब्दुल बासित यांनी रिट्वीट केलेल्या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी देखील बासित यांच्या ट्विटचे अनेक स्क्रिनशॉट पोस्ट केले आहेत.

दरम्यान, बासित यांच्या खात्यावर संबंधित ट्विट दिसत नाहीत. त्यांनी आपले ते रिट्विट काढून टाकले आहे. नायला इनायत यांनी बासित यांनी रिट्विट केलेल्या अनेक ट्विटचे स्क्रिनशॉट पोस्ट केले आहेत. अमर नावाच्या व्यक्तीने याबाबत ट्विट केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-