मुंबई | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सत्तेला अडीच वर्षे लोटली. मात्र, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा केला जातो. पण तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदारांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरुच आहे. अशात भाजप नेत्याने केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत 100 जागा निवडून येतील असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
दरम्यान, दुसकीकडे आता काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
काँग्रेसच्या 25 आमदारांनी नाराजी व्यक्त केली असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आमदार निधीवरून वाद पेटला आहे. अलीकडेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांनी निधी देण्याबाबत घोषणा केली आहे. पण, काँग्रेसच्या आमदार अजूनही नाराज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 3 कोटी रुपये
“काहीतरी गौडबंगाल आहे, लवकरच पेनड्राईव्ह बाहेर काढणार”; नितेश राणे आक्रमक
“90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”
काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…