मुंबई | Tanla Platforms या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 8 वर्षात 35 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
ज्या गुंतवणुकदारांनी या शेअर्समध्ये त्यावेळी फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते ते आज या स्टॉकमुळे करोडपती झाले आहेत. आजतकने या संदर्भात वृत्त दिलंय.
हैदराबादमधील क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनी Tanla Platforms पूर्वी Tanla Solutions म्हणून ओळखली जात होती. आठ वर्षांपूर्वी 28 मार्च 2014 रोजी त्यांच्या स्टॉकची किंमत फक्त 4.31 रुपये होती. आता त्याची किंमत 1,321.30 रुपये झाली आहे.
गेल्या आठ वर्षांत या स्टॉकच्या किमतीत 30,556 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजार विश्लेषकांच्या मते कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत वाढीची शक्यता नाकारता येत नाही.
कंपनीचे ग्राहक वाढत असल्याने कमाईतही सातत्याने वाढ होत आहे. कंपनीच्या सेवा एंटरप्राइझ मेसेजिंगचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे येत्या काळात या स्टॉकच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
आठ वर्षांपूर्वी ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांचे आता तीन कोटींपेक्षा अधिक पैसे झाले आहेत.
31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 356.14 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. तर, त्याच्या आधीच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 209.48 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“काहीतरी गौडबंगाल आहे, लवकरच पेनड्राईव्ह बाहेर काढणार”; नितेश राणे आक्रमक
“90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”
काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात