तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर

मुंबई | कोरोनाच्या (Corona) ओमिक्राॅन व्हेरिएंटनं (Omicron) जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात केल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

अशातच आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता देशातील अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात येत आहे.

देशभरात ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत असताना आता लसीकरणावर भर दिला जात आहे. एकीकडे ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. तर 45 टक्के लोकांनी दुसरा डोस देखील घेतला आहे. त्यामुळे आता समाजामध्ये हार्ड इम्युनिटी (Hard immunity) तयार होत असल्याचं दिसतंय.

एकीकडे ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत असतानाही हार्ड इम्युनिटीमुळे मृत्यूदर कमी राहिल असं तज्ज्ञांनी मत आहे. ओमिक्राॅन नागरिकांच्या शरिरातील हार्ड इम्युनिटी वाढण्यास मदत होणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

ओमिक्राॅनमुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, पुरेपुर दक्षता घेण्याची गरज असल्याचं देखील तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

नाशिकमध्ये सापडलेल्या एका तरूणाला ओमिक्राॅनची बाधा झाली होती. त्यावेळी रँडम सॅम्पल्समधून ओमिक्राॅनचा कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट सध्या समोर येत असल्याने सर्वच गोष्टींवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे हा कोरोना नेमका संपणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या-

रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”

Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?

पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये

‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला

नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती