रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”

नवी दिल्ली |  दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) समोर आलेला ओमिक्रॉन व्हेरियंटने (Omicron variant) जगाची चिंता वाढली आहे. ओमिक्रॉनच्या गंभीरतेवरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. ओमिक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Delta variant) अधिक घातक असल्याच सांगण्यात आलं होतं.

तर काही तज्ज्ञांचे मते ओमिक्रॉनची सौम्य असल्याचं  सांगण्यात येत आहे. त्यातच आता रवी गोडसे (Ravi Godse) यांनी ओमिक्रॉन विषाणू बाबत एक ट्विट केलं आहे.

कोरोनाची साथ आल्यापासून डॉ. रवी गोडसे हे अनेक विषयांवर त्यांचे मत मांडत आहेत. रवी गोडसे यांनी ओमिक्रॉन ही वाईट बातमी आहे. डेल्टा व्हेरिएंटसाठी, असं गोडसे यांनी म्हटलं आहे.

ओमिक्रॉन हा विषाणू मानवजातीसाठी नव्हे तर डेल्टा व्हेरियंटसाठी धोक्याचा ठरणार आहे, असं मत रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे डेल्टा व्हायरस मागे पडू शकतो आणि कोरोना व्हायरस संपण्यासाठी हे चांगलं आहे, असं रवी गोडसे यांनी म्हटलं होतं.

यावेळी रवी गोडसे यांनी देशातील संभाव्य तिसऱ्या लाटेवरूनही वक्तव्य केलं आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे दुहेरी मास्क वापरणे योग्य असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.

लोक व्हॅक्सिन घेत नाहीत हा मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अमेरिकेत एवढ्या केसेस आल्या आहेत. परंतु, आपण जर दक्षिण आफ्रिकेचं पाहिलं तर ज्याठिकाणाहून ओमिक्रॉन सुरू झाला. तिथे संप, केसेस खुप कमी आल्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्यांनी थांबवलं, अमेरिकेतच्या फ्लाईटसं सुरू झाल्या, असं रवी गोडसे एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतामध्ये लसीकरण खूप जास्त प्रमाणात झालं आहे, असं रवी गोडसे म्हणाले आहेत. आपल्या देशातील काम जबरदस्त आहे. एवढया मोठ्या देशातील लोकांना लस देणे सोपे काम नाही, असं म्हणत रवी गोडसे यांनी देशभरात झालेल्या लसीकरणावरून स्तुतीसुमन उधळली आहेत.

भारतामध्ये कोट्यावधी लोकांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे भारताला घाबरायचं काही कारण नाही. परंतु, देशातील नागरिकांनी गर्दी करणं टाळायला हवं, असा सल्ला रवी गोडसे यांनी दिला आहे.

दक्षिण आफ्रिकेत ज्याप्रमाणे ओमिक्रॉन रूग्णांची संख्या कमी झाली तशीच भारतातही कमी होईल, असं  रवी गोडसे यांनी सांगितलं आहे. ज्यांचं लसीकरण झालेलं नाही ते लोक सिरीयस होण्याचं प्रमाण अधिक असल्याही डॉ रवी गोडसे यांनी नमुद केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?

पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये

‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला

नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती