भिकाऱ्याच्या वाढदिवसाची एकच चर्चा; बॅनर लावला, फेटे आणले, डीजे लावला अन्…

बीड | वाढदिवस (Birthday) म्हणजे सर्वाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतो. मित्रमंडळी आपल्या लाडक्या मित्राला वाढदिवस थाटामाटात साजरा करतात.

राजकीय क्षेत्रात येण्याची महत्तवकांक्षा असलेल्या युवा नेत्यांचा वाढदिवस देखील मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. बीडमध्ये देखील अशा पुढाऱ्याच्या वाढदिवसांचं मोठं फ्याड आहे.

बीडमध्ये तलवारीने केक कापत, जीसीबीने फुलांची उधळण करत, डीजे लावत वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवसासाठी लाखो रूपयांची उधळपट्टी केली जाते.

अशातच आता अशा पुढाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बीडमधील काही तरूणांनी अनोखी शक्कल लढवली आहे. तरुणांनी एकत्र येत चक्क एका भीक मागणाऱ्या व्यक्तीचे शहरात पोस्टर लावले.

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या उधळपट्टीचा निषेध करण्यासाठी तरूणांनी चक्क भिकाऱ्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. शहरभर पोस्टर लावण्यात आले.

त्यावर ‘आमचे जीवलग मित्र शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असं लिहिण्यात आलं. त्याखाली शुभेच्छूक म्हणून भावी नगरसेवक LB असं देखील लिहिलं होतं.

डोक्यावर फेटे आणण्यात आले होते. त्याचबरोबर बँडबाजा देखील आणण्यात आला होता. सध्या बीडमध्ये या वाढदिवसाची एकच चर्चा रंगली आहे.

दरम्यान वाढदिवसांवर लाखोंची उधळपट्टी करण्यापेक्षा गोरगरीब निराधारांना मदत करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन या तरूणांनी यामाध्यमातून केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर

रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”

Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?

पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये

‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला