नवी दिल्ली | अमेरिकेतील शीर्ष संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी कोरोनाबाबत जगाला गंभीर इशारा दिला आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही, असं फाउची म्हणालेत.
गेल्या काही महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटली असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, आता कोरोनाचा बीए.2 व्हेरिएंट (BA.2 Variant of Corona) पुन्हा एकदा चिंता वाढवू शकतो, असा इशारा फाउची यांनी दिला आहे.
यूएसमध्ये नोंदवलेल्या नवीन प्रकरणांपैकी सुमारे 30 टक्के प्रकरणं या उपप्रकाराशी संबंधित आहेत. BA.2 Omicron पेक्षा 60 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, परंतु तो अधिक गंभीर दिसत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
डॉ. अँथनी फाउची यांनी सावध केलं आहे की BA.2 व्हेरिएंट कोविड-19 च्या ओमायक्रॉन स्वरूपाचा एक अत्यंत संसर्गजन्य उप-प्रकार आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच अमेरिकेमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते.
दरम्यान, भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार होऊन दोन वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेकदा ठिकठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येत होतं आणि याचा फटका सामान्य नागरिकांना तसंच व्यावसायिकांना बसत होता.
गेल्या काही महिन्यांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटली असल्याने दिलासा मिळाला होता. मात्र कोरोनाने पुन्हा चिंता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यातील ‘या’ भागात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता!
“पंतप्रधानांना 2 तासही झोपू द्यायचं नाही, हे भाजप नेत्यांनी ठरवलंय”
coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट
काँग्रेसला मोठा झटका?, ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत
दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल