मुंबई | साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
देशात काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर क्रूड ऑईलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोरोना संपलेला नाही अजून…’, अमेरिकेतील दिग्गज डॉक्टराचा जगाला अत्यंत गंभीर इशारा
राज्यातील ‘या’ भागात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता!
“पंतप्रधानांना 2 तासही झोपू द्यायचं नाही, हे भाजप नेत्यांनी ठरवलंय”
coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट
काँग्रेसला मोठा झटका?, ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत