अत्यंत धक्कादायक! सुंदर बायकोवर कोणाची नजर पडू नये म्हणून नवऱ्याने केलं भयानक कृत्य

बीड |  लग्नानंतर नवरा आणि बायकोचं नातं हे गुलाबाच्या नाजूक फुलासारखं असतं असं मानलं जातं. सुरूवातीच्या काळात नवरा आपल्या लाडाच्या बायकोला काय हवं काय नको याची काळजी घेतो.

काहीजण आपल्या चांगली देखणी बायको मिळावी, यासाठी नवस देखील बोलतात आणि लग्नानंतर सुंदर बायकोला घेऊन मिरवतात. मात्र, काहींचा विचित्र स्वभाव देखील समाजात पहायला मिळतो. आपली बायको लोकांच्या नजरेत असू नये, असं त्यांना वाटतं.

अशातच आता बीडमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बायको सुंदर असल्याने कोणची नजर लागू नये, म्हणून नवऱ्याने बायकोला एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्ष घरात कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे.

विकृत पतीने पत्नीसह मुलांना देखील डांबून ठेवलं होतं. पीडित महिलेची मोठी बहीण जिल्हा माहिती अधिकारी असल्याने तिला हे प्रकरण हळूहळू समजलं. पिडीताच्या बहिणेने या प्रकरणाला वाचा फोडली.

सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन बहिणीने पोलिसांना हे प्रकरण सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी महिलेची घरातून सुटका केली. दहा वर्ष एकाच घरात डांबून ठेवल्यानं पिडीत महिलेला चालता देखील येत नव्हतं.

दरम्यान, महिलेवर आता शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“केंद्र सरकारला लाज वाटत असेल तर…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली

“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा