मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात शाळा उशिरा सुरू झाल्याने यंदा उन्हाळी सुट्ट्यांमध्येही शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेतला होता. तर शिक्षण विभागाने देखील या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यामुळे पालकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
अशातच राज्य शासनाने शाळांच्या उन्हाळी सुट्ट्य़ांबाबत परिपत्रक प्रसिध्द केलं आहे. त्यानुसार राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात.
2 मे ते 12 जून दरम्यान विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्यानंतर 13 जूनला शाळा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उन्हाळी सुट्टीच्या काळात परीक्षांचे निकाल लागणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हाळ्यामुळे अनेक पालकांनी मुलांना सुट्ट्या द्याव्यात, यासाठी मागणी केली होती. त्यानंतर आता शासनाने हा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अत्यंत धक्कादायक! सुंदर बायकोवर कोणाची नजर पडू नये म्हणून नवऱ्याने केलं भयानक कृत्य
“केंद्र सरकारला लाज वाटत असेल तर…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली
“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादा