मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज मोदी सरकारचा कोरोना काळातील दुसरा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या आणि मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात आत्मनिर्भर आणि बलशाली भारताचा अर्थसंकल्प आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केलं आहे.
जगातील इतर अर्थव्यवस्था कोराना काळात आर्थिक वृद्धीदर चांगला राखण्याचा अंदाज नसताना भारताची अर्थव्यवस्था चांगला विकासदर कायम ठेवेल, असा विश्वास यावेळी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना काळात 9.2 टक्के विकास दर बलशाली भारताचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतिक आहे. देशाच्या विकासदर निश्चित उंचीवर जाणार आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वित्तीय तूट ही कोणत्याही सरकारसमोरील सर्वात मोठी समस्या मानली जाते. सरकारनं वित्तीय तुट 6.4 टक्केपर्यंत कमी आणण्याचं काम केलं आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
सर्व आर्थिक गोष्टींचा विचार केला तर हा अर्थसंकल्प संतुलित असा आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा उद्योजक, स्टार्टअपसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
एमएसपीसाठी 2.37 लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वाधिक तरतूद असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अशात कृषी स्टार्टअपला मंजूरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा हा त्यामागचा हेतू आहे.
महत्वाच्या बातम्या-
Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा
Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर
क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा
Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा