पुढील 24 तास महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | राज्यात अनेक ठिकाणी थंटीची लाट आल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यात अवकाळी पाऊस कोसळला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद रविवारी नोंद करण्यात आली होती. जळगावमध्ये सही नोंद करण्यात आली आहे. पारा थेट 5 डिग्रीवर पोहचला होता.

उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढील 24 तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 9 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

मध्य रात्री आणि पहाटे या 9 जिल्ह्यात धुक्यासह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आता पुणे जिल्हा देखील गारठला असल्याचं दिसतंय.

पुण्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात गारठा जाणवू लागला आहे. पुण्यात 11 ते 18 अंश सेल्सिअसच्या मध्ये तापमान असल्याचं पहायला मिळतंय. तर काही भागात पारा 11 अंंशाच्या खाली देखील पोहचला आहे.

निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे आता द्राक्षे, कांदा, डाळिंब यांसारख्या पिकांवर संकट कोसळलं आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यात थंडीने लोकांचे हाल झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता हवामान खात्याने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Budget 2022 | मोदी सरकारने महिलांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 3 मोठ्या घोषणा

 Budget 2022 | मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?, जाणून घ्या एका क्लिकवर

क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा 

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा 

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा