“बाळासाहेब असते तर एका मिनिटात नवाब मलिकांचा राजीनामा घेतला असता”

मुंबई |  केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यामातून महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्यात येत असल्याची टीका वारंवार महाविकास आघाडीककडून भाजपवर केली जात आहे. अशातच आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जोरदार वाद रंगला आहे.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अवैध व्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राज्यात गोंधळ निर्माण झाला होता. मलिक यांच्यावर ईडीकडून गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

मुंबईत बाॅम्बस्फोट घडवून आणणारा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता व्यवहारात मलिकांचा हात असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. परिणामी हे प्रकरण प्रचंड गाजत आहे.

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घेतला नसल्यानं राज्याचे विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दाऊदची बहिण हसीना पारकरची आणि मलिकांची ओळख होती. या दोघांमध्ये मालमत्तासोबत पैशांचा व्यवहार झाल्यावरही ठाकरेंनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एका मिनिटात मलिकांचा राजीनामा घेतला असता. मुंबईला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकरणात मलिकांचा आपण पाठिंबा का देत आहात, असंही फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीसांच्या भाषणावरून भाजप राज्या सरकारला कोंडित पकडणार हे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, मलिक यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. मलिक सध्या ईडीच्या अटकेत आहेत. त्यांच्या अटकेवर आज नव्यानं सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  सर्वात मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का

“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता आमच्यावरच फुत्कारतंय”

  आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज

  “सरकार पडणार, सरकार पडणार, माझे 170 मोहरे फोडून दाखवाच”

  आनंदाची बातमी! महाराष्ट्रात आज कोरोनानं एकाचाही मृत्यू नाही