सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा ताजा भाव

मुंबई | सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याची किंमत गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. बुधवारी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 45,680 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 46680 रुपये प्रतितोळा आहे. मंगळवारी ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर सध्या प्रतितोळा 46797 रुपये इतका होता.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 44,940 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,180 रुपये असेल. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45680 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46680 रुपये प्रतितोळा इतका आहे.

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.

पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

दरम्यान, गंगानगर कमोडिटी लिमिटेडचे ​​अमित खरे म्हणाले की, चीनमधील वीज संकटामुळे बाजारावर दबाव आहे. जर हे जास्त काळ चाललं, तर शेअर बाजारातील गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होतील. कारण कच्च्या तेलाच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला शह देण्यासाठी ‘या’ शहरात पवारांच्या तीन पिढ्या उतरल्या मैदानात!

भावाच्या अटकेनंतर सुहाना खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मधुमेही रूग्णांंनी आहारात ‘या’ फळांचा समावेश करावा, साखर नियंत्रणात राहिल

वृद्ध दाम्पत्याचा चिलम फुंकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

एनसीबी चौकशीवेळी आर्यन खानने कुटुंबाबद्दल केला ‘हा’ धक्कादायक खुलासा!