फँड्रीतील शालूच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या फँड्री चित्रपट शालू म्हणजेच राजेश्वरी खरातने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फँड्री चित्रपटात राजेश्वरीने मुख्य भूमिका साकारली होती. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रात एक वेगळंच नाव कमावलं आहे.

राजेश्वरीचा फँड्री हा चित्रपट पहिला होता. तिने या चित्रपटातूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. राजेश्वरी तिच्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते. वारंवार ती आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काहीना-काही पोस्ट करत असते.

काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने तिच्या आकाऊंटवरून एका गाण्यावर डांन्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. तसेच तिने या व्हिडीओमध्ये आपला हॉट लूक दाखवला होता. हा व्हिडीओ राजेश्वरीने फेसबुक आकाऊंटवरून पोस्ट केला होता.

अशातच राजेश्वरीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहोत.

राजेश्वरीने आऊटडोर फोटोशूट केलं आहे. तीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिने पिवळ्या रंगाचा वनपिस घातला आहे. त्यात तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.

तसेच राजेश्वरी पुण्याची राहणारी आहे. तिला फँड्री चित्रपटासाठी विचारण्यातं आलं होतं तेव्हा तिने सुरूवातीला नकार दिला होता. कारण ती त्यावेळी इयत्ता दहावीत शिकत होती. परंतू फँन्ड्रीतील शालू आणि आताची शालू यामध्ये खूप जमिन आसमानाचा फरक आहे. आताच्या तिची जी परस्नॅलिटी आहे, त्यावर विश्वासच बसत नाहीय.

तिच्या या व्हायरल फोटोवर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी या फोटोंना वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत.

दरम्यान,  राजश्री खारटला फँड्री या चित्रपटानंतर खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर राजश्रीला ‘अटमगिरी’ हा चित्रपट मिळाला होता. याही चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट जास्त यश प्राप्त करू शकला नाही.


महत्वाच्या बातम्या-

रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला करिनाच्या दुसऱ्या मुलाचा…

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, जाणून घ्या काय…

तहानलेल्या आधुनिक काळातील कावळ्याने पाणी पिण्यासाठी लढवली…

काय सांगता! वजन वाढल्याने मांजरालाही आलं टेन्शन, पाहा…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार नव्या भूमिकेत,…