मुंबई | दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकणार आहेत. फरहान आणि शिबानीचे चाहते त्या दोघांच्या लग्नासाठी कमालीचे उत्सुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांच्याही लग्नाच्या चर्चा सातत्याने होत होत्या.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शिबानी दांडेकर या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अशा परिस्थितीत शिबानीच्या आयुष्यातील इतका खास सोहळा रिया मिस करणं शक्यच नाही.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया आयुष्याच्या खूप वाईट टप्प्यातून जात होती. त्यावेळी त्याच्या मित्र-मैत्रिणींनी सपोर्ट केल्याचं दिसून आलं.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर दोघही मराठमोळ्या पध्दतीनं लग्न करणार आहेत. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी रिया चक्रवर्तीच्या कठीण काळात तिला खूप साथ दिली होती.
17 फ्रेब्रुवारीपासून फरहान-शिबानाच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. यावेळी अभिनेत्री रिया चक्रवती ही उपस्थित होती आणि भन्नाट डान्स केला.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा मेंहदी आणि हळदी सोहळा चांगलाच रंगला. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अनुषा दांडेकर यांच्या डान्सचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
ज्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि अनुषा दांडेकर दोघीही जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रिया आणि अनुषा दांडेकर फरहानच्या अपार्टमेंटमधील टेरेसवर डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचा विवाह खंडाळा फार्महाऊसवर 19 फेब्रुवारीला होणार आहे. वडील आणि प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी हे लग्न कुटुंबीय आणि मित्राच्या उपस्थित होणार असल्याचं सांगितलं जातंय.
पाहा व्हिडीओ-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
“किरीट सोमय्यांना वाॅचमनची नोकरी द्या, नाहीतर माळ्याची नोकरी द्या…”
विराटच्या RCBला मिळणार नवा कर्णधार; आता धोनीचा ‘हा’ भिडू सांभाळणार जबाबदारी
मुंबईच्या बोरिवली परिसरातील 24 मजली इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती
Video: ‘ऊ अंटावा’नंतर समांथाचा आणखी एक डान्स व्हायरल; विमानतळावर नक्की काय झालं?
“बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही”; अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल