धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांचा मनसेत प्रवेश!

मुंबई : मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

नरेंद्र पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर केलं नसलं तरी ते धुळ्यातूनच लढतील, असं बोललं जात आहे.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील तरुणांनी, महिलांनी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, पाच तारखेला आपली पहिली प्रचार सभा पार पडणार असल्याचं सांगत जे इतके दिवस बोललो नाही ते आता बोलणार आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-