मी ब्ल्यू फिल्म करत नाही- राज ठाकरे

मुंबई : प्रचारसभांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फटकेबाजी नवीन नाही. अगदी मुख्यमंत्र्यांना ‘पोपट कसा दिसला?’ असा द्वयर्थी प्रश्न विचारण्यापर्यंतही राज ठाकरेंची मजल गेली होती. त्यातच आता मी ‘ब्लू फिल्म’ करत नाही, अशी मिश्किल टिपणी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली.

राज ठाकरे यांना पत्रकारांनी किती जागा लढवणार, प्रचारसभा कुठे कुठे घेणार, ब्लू प्रिंटचं काय असे धडाधड प्रश्न विचारले.

‘ब्लू प्रिंट’ हा शब्द उच्चारताना पत्रकार चुकला आणि ‘ब्लू फिल्म’ असं बोलून गेला. राज ठाकरेंनी हाच धागा पकडला आणि मी ‘ब्लू फिल्म’ करत नाही, असं हसत उत्तर दिलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

दरम्यान, नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले. यावेळी राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील अशी आशा होती, मात्र त्यांनी पुढचा प्लॅन न सांगता जाता जाता फटकेबाजी केली. 

महत्वाच्या बातम्या-