लेकीला छातीशी कवटाळून धायमोकलून रडला; युक्रेनमधील बाप-लेकीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर युक्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्याला पाहून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत. रशिया-युक्रेन युद्ध आणि यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत. या वेळी वडील आणि मुलीचे डोळे पाणावले आहेत.

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्रच चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा परस्थितीत एक बाप लेकीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एक वडील बसमध्ये बसून आपल्या मुलीचा निरोप घेत आहेत.

@lil_whind नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिलं आहे, की युक्रेनियन बाप आपल्या कुटुंबाला अलविदा म्हणतो, तर तो रशियनांशी लढण्यासाठी मागे राहतो.’ यासोबतच लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट केला आहे. या व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिलं आहे की युक्रेनियन बाप आपल्या कुटुंबाला अलविदा म्हणतो, तर तो रशियनांशी लढण्यासाठी मागे राहतो.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाला सर्व जगभरातून विरोध केला जात आहे. युद्ध व्हायलाच नको, अशी भूमिका प्रत्येक देशांनी घेतली आहे. तर रशिया आणि युक्रेनने मात्र युद्धाची भूमिका सोडलेली नाहीये.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेेनेचा ‘हा’ नेता तपास यंत्रणांच्या रडारवर 

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या युक्रेनला जो बायडन यांचा धक्का; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

नरेंद्र मोदींचा व्लादिमीर पुतिन यांना फोन, दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला