वडील चर्मकार, आई करते मजुरी; मराठी मुलानं उभारलं असं साम्राज्य, आता करोडोची उलाढाल!

नवी दिल्ली | प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येत असतात. पण काही जाती व्यवस्था समाजातील लोकांना विरोध करत असतात. त्यामुळे समाजात हळूहळू तेढ निर्माण होते. या भेदभावामुळे अनेक समस्या उभ्या राहतात. पण या सर्व गोष्टींना तोंड देऊन हिंमतीने सामोरे गेलेल्या व्यक्तीही असतात.

अशीच अशोक खाडे यांची गोष्ट आहे. त्यांनी स्वतःची कंपनी उभारली, ४५०० लोकांना रोजगार दिला आणि कंपनीची वार्षिक उलाढाल ५०० कोटी आहे. त्यांचा हा प्रवास खूपच संघर्ष आणि संकटांनी भरलेला होता, पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही त्यामुळे हे शक्य झालंय. अशोक यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पेड गावात झाला.

त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला होता. चांभार समाजातून आलेले लोक परंपरागत मृत पावलेल्या जनावरांचे कातडे काढण्याचे काम करायचे. वडील चांभाराचे काम करायचे तर त्यांची आई शेतात मजुरी करायच्या. या सहा मुलांच्या कुटुंबात जेवण मिळणेही कठीण होते. कधीतरी त्यांना उपाशीच झोपावं लागायचं. अशोक यांच्या कुटुंबाने गरिबी, भेदभाव सारख्या गोष्टींचा सामना करावा लागला.

काही दिवस गावात राहिल्यावर अशोक यांच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी चांभाराचे काम केले. ते चित्रा टॉकीजजवळ काम करत होते. अशोक यांनी सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. १० वी नंतर वडील आणि भावाला मदत करण्यासाठी मुंबईला गेले. त्यावेळी त्यांचे भाऊ माझगाव डॉक नावाच्या कंपनीत वेल्डर म्हणून काम करत होते.

अशोक यांनी आपले शिक्षण चालू ठेवत भावाच्या कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यास चालू केले. त्यानंतर अशोक यांनी १९७५ ते १९९२ पर्यंत माझगाव डॉकमध्ये काम केले. अशोक यांनी स्वतःची कंपनी चालू करण्यासाठी आपले संपर्क आणि कौशल्य वाढवायला चालू केल. त्यातच १९८३ मध्ये त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली.

तेथून त्यांना उद्योजक होण्याची कल्पना सुचली. १९९५ मध्ये त्यांनी DAS Offshore कंपनी सुरू केली. त्यांनी DAS हे नाव दत्ता, अशोक आणि सुरेश या त्यांच्या तीन भावांवरून ठेवले. त्यांना पहिले काम माझगाव डॉकमध्येच मिळाले. मुंबईतील पहिला स्कायवॉक बांधला. तिथून मग त्यांनी मागे वळून पाहिलच नाही. त्यानंतर ओएनजीसी, इस्सार, ह्युंदाई सारख्या दिग्गज कंपन्या त्यांचे ग्राहक आहे.

या कंपनीच्या इंजिनिअरिंग, डेअरी, ऍग्रो प्रॉडक्ट्स, रस्ते बांधणी, उड्डाणपूल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सात कंपन्या आहे. अशोक यांची आई ज्या शेतात काम करत होती, ते संपूर्ण शेत विकत घेतले. एकदा त्यांना जाती व्यवस्थेमुळे मंदिरात प्रवेश दिला नाही.

आईच्या इच्छेनुसार त्यांनी त्याच गावात एक मंदिर बांधले. भविष्यात त्यांना गावात रुग्णालय, शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करायच आहे. जिद्द, चिकाटी, स्वतःवर असलेल्या ठाम आत्मविश्वासामुळे माणूस कधी हरत नाही, हेच यातून स्पष्ट होते.

महत्त्वाच्या बातम्या-

आई-वडिलांनी भाजीपाला विकून शिकवलं, पोरीनं साऱ्या राज्यात त्यांचं नाव करुन दाखवलं!

सोशल मीडियावरील एका व्हिडीओचा चमत्कार; रडणारा बाबा हसू लागला!

बेअरस्टोचं शतक हुकलं, मात्र केलाय असा पराक्रम ज्यात डेविड वॉर्नरही सहभागी!

निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमध्ये केलाय असा पराक्रम, जो कुणालाही जमला नाही!

इलेक्ट्रिक कारमध्ये टाटांची बाजी; नेक्सॉननं रचला ‘हा’ सर्वात मोठा कारनामा!