नवी दिल्ली | देशाचा नवा राष्ट्रपती कोण याचा निर्णय आज होणार आहे. 18 जुलै रोजी झालेल्या 16व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार आहे.
आज संध्याकाळपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. तत्पूर्वी मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भारताला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत.
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता तर सर्व विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठिंबा होता. या मतदानात एकुण 4800 खासदार व आमदारांनी सहभाग घेतला होता.
मुर्मू विजयी झाल्या तर त्या पहिल्या आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतीपदावर विराजमान होतील. तसेच मुर्मूंचा विजय जवळजवळ निश्चित असल्याचं म्हटलं जात असताना आज 15 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
पंधरा वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील विजयी झाल्या होत्या व त्यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.
आज मुर्मूंचा विजय झाला तर त्यांच्या रूपाने देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळतील. आज संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 25 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता. तसेच 24 जुलै रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा देखील 25 जुलै रोजी पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त
कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ
‘उद्धव ठाकरेंनी ‘ती’ मोठी चूक केली’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
“ठाकरे सरकारने 15 महिने टाईमपास केला, आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून दिलं”
नाना पटोलेंचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी केला शेअर!