हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नाना पटोले चित्रा वाघ यांच्यावर बरसले, म्हणाले…

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट करत नाना पटोलेंवर टीका केली होती.

या व्हिडीओत एक व्यक्ती चेरापुंजी, मेघालय येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीने टि-शर्ट घातला असून नाना पटोलेंचेही तशाच टी-शर्टमधील फोटो या व्हिडीओत जोडण्यात आले आहेत. तर व्हिडीओतील ती व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

काय नाना.. तुम्ही पण झाडी डोंगर आणि हाटीलात असं म्हणत चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंनाही या ट्विटमध्ये टॅग केलं. या व्हिडीओवरून अनेक चर्चा रंगत असताना आता नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे.

व्यक्तिगत बदनामी करण्याचं हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. या व्हिडीओमुळे नाना पटोले पुरते भडकल्याचं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओ विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा देखील नाना पटोलेंनी दिला आहे. तर हा व्हिडीओ आधीच व्हायरल झाला असून आपण नंतर ट्विट केलं असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

काही वेळातच हा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. एकंदर राजकीय वातावरण बघता येत्या काळात या व्हिडीओवरून आरोप-प्रत्यारोपाची चिखलफेक होण्याची दाट शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ-

 

महत्त्वाच्या बातम्या-

पंधरा वर्षांपूर्वीही आजच देशाला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती, मुर्मू इतिहासाची पुनरावृत्ती करणार?,

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, राष्ट्रवादीचे सर्व विभाग व सेल बरखास्त

कर्नाटकच्या उडिपी टोल नाक्यावरचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

‘उद्धव ठाकरेंनी ‘ती’ मोठी चूक केली’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

“ठाकरे सरकारने 15 महिने टाईमपास केला, आम्ही ओबीसी आरक्षण मिळवून दिलं”