लढाऊ नेतृत्त्व हरपलं! ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन

मुंबई | शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे.

एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली.

ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होतं. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना मे 2021 मध्ये कोरोना संसर्ग झाला होता.

प्रा. एन. डी. पाटील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता.

नारायण ज्ञानदेव पाटील असं त्यांचं पूर्ण नाव असून 15 जुलै 1929 ला सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला.

पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केलं होतं.

महत्वाच्या बातम्या- 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय 

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; 1 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू होणार

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं 

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय