‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी

पुणे | इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. यावर कुठलंही बंघन नसल्याने सोशल मीडियावर बरेच तरूण आपल्याला वाटेल त्या भाषेत व्हिडीओ करत आसल्याचं आपल्यालाल पाहायला मिळतं.

वादग्रस्त भाषा वापरल्यामुळे याआधी अनेक तरूणांना पोलिसांनी अटक केल्याच्या घटना घडल्यात. काही दिवसांपूर्वी पिंपरतील तरूणाला पोलिसांनी कोयता घेऊन व्हिडीओत धमकी दिल्याप्रकरणी अटक केली होती.

ही घटना ताजी असताना असाच प्रकार पिंपरीमध्ये घडलाय. या व्हिडीओमध्ये मुलगी भाईगिरीची भाषा बोलताना दिसत आहे. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ही मुलगी अगदी कसलेल्या गुंडांप्रमाणे गुंडगिरीची भाषा बोलताना दिसत आहे. तिने आपल्या सोशल गुंडागिरीचे व्हिडिओ इन्स्टावर अपलोड केले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये संबंधित तरुणी कुठला डॉन आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील 302 असं थेट म्हणताना दिसत आहे.

302 हे खून प्रकरणातील कलम असून पोलीसांकडून खूनाच्या आरोपींवर हे कलम लावले जाते. संबंधित तरुणी एवढ्यावरच न थांबता ज्ञान पाजळतानाही दिसून येत आहे. शब्दाने शब्द वाढत असल्याने शिव्या न देता हाणामारी करून भांडणं सोडवायची असंही म्हणताना दिसते.

महत्वाच्या बातम्या- 

‘…म्हणून ते हे सगळं करतायेत’; शिवसेना नेत्याने अभिनेता किरण मानेंना फटकारलं 

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय 

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, आकडेवारीबाबत धक्कादायक माहिती समोर 

मोठी बातमी! पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 5 बड्या नेत्यांचा भाजपत प्रवेश