पुणे | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे.
एवढे निर्बंध घालून देखील पुणे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थीती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
19 फेब्रुवारी रोजी पुण्यात आज दिवसभरात 2 हजार 834 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समज आहेत. त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 29 हजार 383 एवढी झाली आहे.
808 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत 2 लाख 5 हजार 478 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तसेच आज 28 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत पुण्यात मृत्यूचा आकडा 5 हजार 17 वर गेला आहे. त्याचबरोबर आज दिवसभरात 12 हजार 625 व्यक्तींची नमुना म्हणजेच स्वॅब चाचणी करण्यात आली.
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने 14 मार्चपर्यंत लागू केलेले निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना खबरदारी घेण्याचेही आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. तरीही पुण्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नसल्यानं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत नविन नवे आदेश दिले आहेत.
तसेच मुरलीधर मोहोळ यांना लॉकडाऊनसंबंधी विचारण्यात आलं. आताच्या घडीली लॉकडाऊनचा विचार नाही. परंतू नागरिकांची साथ कमी पडली तर पुण्यात लॉकडाऊन करवं लागेल, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थीतीही बिकट होत असल्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांसंबंधी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
त्यामध्ये राज्य शासनाने राज्यातील सर्व खासगी कार्यालये व अस्थपनामध्ये आरोग्यसेवा, अस्थापनना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-