मुंबई | सध्या कोरोना महामारीनं सर्वांना अनेक प्रकारे जखडून ठेवलं आहे. प्रत्येकाला आपल्या आहारावर सध्या विशेष लक्ष द्यावं लागत आहे. मांसाहारी खाणाऱ्यांसाठी अंडी (Egg) हा महत्त्वाचा पदार्थ आहे.
अंडी हे अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. अंडी ही अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना नाश्त्यात खायला आवडते, परंतु एका नवीन अभ्यासानुसार, जास्त अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
खूप लोक दररोज एक किंवा अधिक अंडी खातात म्हणजे सुमारे 50 ग्रॅम, त्यांना मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांनी वाढू शकतो. याचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक दिसून आला आहे, परिणामी आता अंडी खाण्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने चायना मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटी सोबत हा अभ्यास केला. हा अभ्यास 1991-2009 या कालावधीत करण्यात आला. यामध्ये चीनमधील लोकांवर अंडी खाल्ल्याचा काय परिणाम होतो याबाबत पहिला अभ्यास करण्यात आला.
अंडी खाणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम वयातील लोकांचा समावेश आहे. जर टाईप 2 मधुमेह असेल तर त्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे आहारातील कोणत्या घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते हे समजून घेणे आवश्यक आहे, असं तज्ज्ञांच मत आहे.
प्रक्रिया केलेले आहार, जास्त प्रमाणात मांसाहारी गोष्टी, स्नॅक्स आणि आहारात उर्जायुक्त गोष्टी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो, असा निष्कर्षदेखील शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे.
सध्या नागरिकांमध्ये अंड्यांचे सेवनही वाढले आहे ज्यामुळं मधुमेहाचा धोका वाढतो. गेल्या दशकात अंडी खाणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे.
दरम्यान, सध्यातर अंडी खाणाऱ्यांना हिवाळ्यात अंडी खायला खुप आवडतात. पण काळजी घ्या अंडी ही योग्य प्रमाणात खा जेणेकरून तुमच्या शरीराचं संतुलन निट राहील.
महत्त्वाच्या बातम्या –
MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली
ओमिक्रॉनचं ‘हे’ पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध
“मी रिटायर झालेला माणूस, आता मला कोण विचारतंय?”
काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव
नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे