हातातोंडाशी आलेला घास गारपिटीनं गेला! राज्यातील ‘या’ भागांना मोठा फटका

मुंबई | हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसत असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतुमध्ये शेतकरी आपल्या पिकांना जपत असतो. पण अवेळी पाऊस अन् अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना उद्धवस्त करत आहे.

राज्यात काही भागात अवकाळी पावसानं दणका दिला आहे. ऐन बहरात असणारी पिकं या पावसानं खराब केल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. अद्यापही काही भागत पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे. श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यातील शेतीला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसानं द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे.

गोदावरी तिरावरील भागाला अवकाळी पावसाचा मोठा सामना करावा लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही काही भागात पाऊस झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.

अहमदनगरच्या श्रीरामपूर, नेवासा आणि वैजापूर तालुक्यातील गावांमध्ये गारपीट झाली. या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या द्राक्ष, कांदा, गहू आणि हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

अचानक झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. परिणामी ज्याभागात नुकसान झालं आहे तीथं तात्काळ पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यातील सुरु असलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलंय. मोठ्या मेहनतीनं पिकवलेल्या शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याचं संकट शेतकऱ्यांवर ओढावलं आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात देखील काही ठिकाणी गारपीट झाली आहे. अकोला शहरात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली होती. गारपीटदेखील झाली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हवामान खात्यानं राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. परिणामी हवामान खात्याचा तो अंदाज खरा ठरला आहे. अवकाळी पावसाची शक्यता अद्यापी कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जेल मिळणार की बेल मिळणार? नितेश राणेंचे वकील म्हणतात…

भाजपचे आमदार फुटणार???, नाना पटोलेंचे सुचक संकेत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

काल रात्री नेमकं काय घडलं?, रोहिणी खडसेंनी सांगितला थरारक अनुभव

नितेश राणे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची ताकद नाही – नारायण राणे