जाणून घ्या! तांदळाच्या पाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाची शेती केली जाते. भात हा आपल्या आहाराचा मुख्य आणि महत्त्वाचा घटक आहे. आपण आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकरिता, सौंदर्याकरिता अनेक क्रीम्स, लोशन्स , निरनिराळी तेले यांचा वापर करीत असतो. पण खरे तर त्वचेला तजेला आणि केसांना सुंदर चमक देण्यासाठी करावयाचा उपाय आपल्या घरामध्येच आहे. त्यासाठी आपल्याला बाजारामधून महागडी क्रीम्स, लोशन्स आणण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा उपाय म्हणजे तांदळाचे पाणी. शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

तांदळाचे पाणी पिण्याचे फायदे – 

1. केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात.

2. तांदळात मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वे, फायबर, व्हिटॅमिन बी आणि कार्बोहायड्रेटही असतात. हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक आहेत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही केवळ शिजवलेल्या तांदळाचे पाणी प्यायल्यास हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.

3. तांदळाचे पाणी फायबराने पुरेपूर असतात. हे आपल्या मेटाबॉलिझमला वाढविण्यात मदत करतात. पचन तंत्र सुधारून चांगल्या जिवाणूंना सक्रिय करण्याचे काम करतात. जेणे करून आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही.

4. मुरुमांच्या समस्येमध्ये देखील तांदळाचे पाणी फायदेशीर आहे. हे मुरुमांचा लालसरपणा, सूज आणि खरुज काढून टाकते आणि नवीन मुरुमांना तयार होण्यापासून प्रतिबंध करते. रात्री झोपताना दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा.

5. तांदळाच्या पाण्यामध्ये ताक मिसळून प्यायल्याने बॉडीमधून पाण्याची कमतरता दूर होते.

6. ताप, जुलाबाचा त्रास होत असल्यास तांदळाची पाणी प्यावं. तांदळाचे पाणी केस आणि त्वचेसाठी देखील पोषक आहे. यामुळे केस आणि त्वचा सुंदर होण्यास मदत मिळते.

7. शरीरात पाण्याची कमी डिहायड्रेशनच्या रूपात होते. विशेष करून हा त्रास उन्हाळ्यात जाणवतो. तांदळाचे पाणी आपल्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेला संतुलित करतं.

8. हे पाणी त्वचेसाठी चांगले क्लीन्झर आणि टोनर म्हणून देखील काम करते. सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करते. यासाठी तांदळाचे पाणी कॉटन बॉलमध्ये घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा.

महत्वाच्या बातम्या – 

व्हायचं होतं पत्रकार झाला अभिनेता, वाचा ‘या’ अभिनेत्याचा किस्सा

वाढदिवसाच्या दिवशी आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम, शेअर केली ‘ही’ शेवटची पोस्ट

तिनं तरुणाला खुलेआम प्रपोज केलं, पण चांगलंच महागात पडलं; पाहा व्हिडीओ

स्टेजवरंच उर्वशीसोबत जे घडू नये ते घडलं, ड्रेस खाली सरकला अन् मग…; पाहा व्हिडीओ

जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनसोबत बांधली लग्नगाठ, लग्नातील फोटो व्हायरल