व्हायचं होतं पत्रकार झाला अभिनेता, वाचा ‘या’ अभिनेत्याचा किस्सा

अभिनेता अभय देओल हा त्याच्या हटके भूमिकांसाठी कायम ओळखला जातो. एकाच प्रकारच्या भूमिका न करता कायम वेगळ्या भूमिका साकारत अभयने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अभयचा वाढदिवस आहे त्यामुळे अनेक कलाकारांकडून अभयला शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

अभय देओल हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध प्रोड्यूसर आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभय देओलचे वडील अजितसिंग देओल हेसुद्धा बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि निर्देशक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनचं अभय देओलला अभिनयाचा वारसा मिळाला होता.

15 मार्च 1976 मध्ये मुंबई येथे अभयचा जन्म झाला. अभयनं मुंबईमध्ये असताना आपलं शिक्षण अर्धवट सोडून दिलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या डोक्यात आपल्या करिअरला घेऊन पत्रकारिता, पेंटीग, फिलॉसॉफर आणि अभिनेता अशा 4 कल्पना होत्या.

मात्र अभयचा कल अभिनयाकडे असल्यानं त्यानं अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच अभिनेता ऐवजी आपल्याला अभयला एक पत्रकार म्हणूनसुद्धा बघता आलं असतं. अभयनं न्युयॉर्क मधून अभिनय आणि नाटकाचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे.

नुकताच अभय हॉसस्टारवरील ‘1960 वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये झळकला होता. ‘सोचा ना था’ या सिनेमातून अभयने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यानंतर ‘देव डी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ अशा सिनेमांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

अभयने आपल्या अभिनय कारकिर्दीत गंभीर, कॉमेडी, प्रेमी अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. देव डी आणि ओए लक्की लक्की ओए या चित्रपटांतून अभयच्या अभिनयाला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या –

वाढदिवसाच्या दिवशी आमिर खानचा सोशल मीडियाला रामराम, शेअर केली ‘ही’ शेवटची पोस्ट

तिनं तरुणाला खुलेआम प्रपोज केलं, पण चांगलंच महागात पडलं; पाहा व्हिडीओ

स्टेजवरंच उर्वशीसोबत जे घडू नये ते घडलं, ड्रेस खाली सरकला अन् मग…; पाहा व्हिडीओ

जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनसोबत बांधली लग्नगाठ, लग्नातील फोटो व्हायरल

मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांची विकेट पडणार? महाविकास आघाडीचा मोठा निर्णय