जाणून घ्या! काजू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

काजूला ड्रायफ्रुट्समधील सर्वात चविष्ट पदार्थ मानले जाते. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी मोठ्या प्रमाणात असते, तसेच काजूमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजूचे सेवन आरोग्यासाठी गुणकारी असतं. त्यामुळे दैनदिन जीवनात काजूचं सेवन करणं गरजेचं असतं. काजूचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत.

काजू खाल्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. काजू खाल्याने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते.

2. काजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्यानं रक्तातील अशुद्धी दूर होण्यास मदत होते. रक्तवाहिन्याचे काम सुधारण्यास मदत होते.

3. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी,के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते.

4. काजूमध्ये असलेले अँटीऑक्‍सिीडंट्‌स मुळे डोळ्याच आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

5. काजू खाल्ल्यामुळे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ति वाढते.

6. काजू खाल्ल्‌याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते. त्यांनी काजू आवर्जून खायला द्यावेत.

7. मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या मुडस्विंग्सच्या वेळी देखील काजू खाल्याने चांगला फायदा होतो.

8. काजूमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुले डायबिटीजच्या रुग्णांसाठी काजू फायदेशीर ठरतात.

9.  काजूतील पोषकतत्वांमुळे पेशीच्या डीएनएचं रक्षण होतं. यामुळे अनेक पेशी निरोगी राहतात. त्यामुळे अधिक आजारांपासून मुक्तता मिळते.

10. काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात.

महत्वाच्या बातम्या –

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव! सोशल मीडियावर चर्चांना उधान

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो

मोठी बातमी: 1 मार्चपासून ‘या’ सर्वसामान्य लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

आणखी एका स्टारकिडचं कलाविश्वात पदार्पण, झळकणार ‘या’ भूमिकेत

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा