जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव! सोशल मीडियावर चर्चांना उधान

गुजरातमधील अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वी या स्टेडियमचं नाव सरदार वल्लभ पटेल  होतं. ते बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवं नाव असेल, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलं.

सध्या या स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. मात्र आता स्टेडिअमचं नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव या स्टेडियमला दिल्यामुळे मोदी सरकारवर टीकेची झोड होताना दिसत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्टेडिअयच्या नव्या नावाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या स्टेडियमला नाव देताच सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला आहे. भाजप आणि सरकारचे समर्थक यांनी या स्टेडियमला मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे सांगून त्याचे समर्थन केले आहे. तर काँग्रेस आणि भाजपा विरोधकांनी सोशल मीडियावर याविषयी आक्षेप घेतलेला पहायला मिळाला.

दरम्यान, गुजरात मध्ये उभारण्यात आलेलं हे स्टेडियम सरदार पटेल स्पोर्टस इन्क्लेव्हचा भाग आहे. या स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम आणि मैदानात 11 खेळपट्या आहेत. आधुनिक अशा एलईडी लाईट्स देखील मैदानात बसवण्यात आल्या आहेत. जय शहा हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना या स्टेडियमची पुनर्बांधणी करण्यात आली होती. या स्टेडियमवर 1 लाख 10 हजार लोक सामना पाहू शकतात. शिवाय पावसाचे थेंब स्टेडियममध्ये येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतलेली आहे.

या स्टेडियमवर  स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणाऱ्या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक संयुक्त कार्यक्रम झाला होता.

 

महत्वाच्या बातम्या –

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो

मोठी बातमी: 1 मार्चपासून ‘या’ सर्वसामान्य लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

आणखी एका स्टारकिडचं कलाविश्वात पदार्पण, झळकणार ‘या’ भूमिकेत

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

….म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ – मुंबई महापालिका आयुक्त