भाजप-सेनेमध्ये जागावाटपाची पहिली फेरी पार; शिवसेनेला फक्त ‘एवढ्या’ जागा

मुंबई : भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची पहिली फेरी पार पडली आहे. यावेळी महायुतीतील इतर घटकपक्षांना 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाल्याचं समजतय. या दोन्ही पक्षांमध्ये 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या आहेत, यावर चर्चा होणार आहे.

भाजपला 160 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. तर स्वत:साठी शिवसेनेला 110 पेक्षा कमी जागा अमान्य आहेत.चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर सध्यातरी भाजप 160, शिवसेना 110 आणि मित्रपक्ष 18 या फॉर्म्युलाबाबत खलबतं सुरू असल्याचं समजतंय.

प्राथमिक फेरीत हा फॉर्म्युला अंतिम नाही. यावर चर्चेच्या आणखी फेऱ्या बाकी असून त्यानंतर अंतिम जागावाटप ठरणार आहे. या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई हे उपस्थित होते.

दरम्यान, काही दिवसातचं विधानसभा निवडणूक आचारसहिंता लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अशातच निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार की मागील निवडणुकीप्रमाणे सर्व पक्ष स्वबळाची वाट निवडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-