चमत्कार!!! आधी प्रदक्षिणा, नंतर घातला दंडवत; त्यानंतर मारुतीसमोर वानरानं सोडले प्राण

सांगली | हनुमानाची ओळख देशात वेगळी वेगळी आहे.  कुणासाठी तो हनुमान तर कुणासाठी बजरंगबली आहे.  पण महाराष्ट्रात गावोगावी तो मारुती म्हणुन प्रसिद्ध आहे.  थोडं बारकाईने बघितलं तर हनुमान आणि बजरंगबली या दोन्ही नावांना मोठ्या उत्सहाने लोक घेतात. पण मारुतीराया हे नाव सगळ्यात जास्त आपुलकी आणि सच्च्या भक्तीने घेतलं जातं.

मिरज तालुक्यातील गुडेवाडी येथे दक्षिणमुखी हनुमान मंदीरात आश्चर्य वाटनारी एक आगळी वेगळी घटना घडली आहे.  शनिवारी सकाळी हनुमान मंदिरात एका वानराने प्रवेश केला नाही  तर त्याने मारुतीरायाला दंडवत ही घातला. पण या सच्चा भक्ताने सेवाच करत स्वतःच प्राण सोडला आहे.

अनेक भाविक भक्त दर शनिवारी मारुतीराया पुढे नतमस्त होतात. या वेळी सगळ्याच्या उपस्थितीत या वानराने दंडवत घालून प्राण सोडले आणि येथिल नागरिक आश्चर्यचकीत झाले होते. काही मारुती भक्तांनी ही घटना मोबाईलमध्ये शुट केली. खुप पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात या वानराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

गुडेवाडी येथे पुरातन दक्षिणमुखी मारुती मंदिराचे नविन बांधकाम केले आहे. हे काम करुन आता पाच ते सहा वर्ष झाली आहेत.  या मंदिरात सांगली, मिरज, अथणी, सातारा, कोल्हापूर, रायबाग, मुंबई, पुणे येथून मारुती भक्त प्रत्येक शनिवारी दर्शनासाठी येत असतात.हिंदू संस्कृतीत रोज सकाळी देवाला नमस्कार करण्याची प्रथा आहे.

आताच नवे वर्ष सुरू झाल्याने शनिवारी सकाळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. मंदिराच्या परिसरात बाहेर झाडावर वानरांचा कळप बसला होता. त्यावेळी या कळपातले एक वानर अचानक मंदिरात शिरले.  ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर येऊन बसले. त्यानंतर काही वेळाने हे वानर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारात उंबऱ्यावरच बसून राहिले.

त्यानंतर अनेक भाविकांनी या वानराचे दर्शन घेतले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याच्या उबरठ्यांवर दक्षिणेकडे तोंड करून हे वानर बराच वेळ तिथेच बसले होते.  त्या वानराची हालचाल बंद झाली होती. बराच वेळ गेल्या नंतर ते वानर तेथून हालत नसल्याने भाविकांनी त्याच्या जवळ जावून पाहिले. पण त्याने गाभाऱ्यावरच प्राण सोडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विज्ञान युगात साक्षात पुरातन असणाऱ्या दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या उंबऱ्यावर वानराने प्राण सोडल्याची घटना घडली.  तेथील भाविकांनी स्व:ताच्या डोळ्याने हे क्षण टिपले आहेत. शनिवार हा हनुमानाचा दिवस आणि हनुमान मंदिरातच वानराने प्राण सोडल्याची माहिती भाविकांना समजल्यानंतर दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.

हनुमानाचं भव्य दिव्य रूप वानर असल्याची गोष्ट आपण विसरून जातो. हनुमानाच्या भव्य दिव्य मूर्ती बघत राहतो. मारुतीच्या मूर्तीबद्दल गावाला प्रचंड जिव्हाळा आणि आदर असतो.  कुस्तीची तालीम असो किंवा निवडणूक यात मारुतीराया महत्वाचा असतो.

महत्त्वाच्या बातम्या-