या सर्वात स्वस्त SUVची लोकप्रियता पोहोचली शिखरावर; 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड!

मुंबई | निस्सान मॅग्नाईटने ऑटो इंडस्ट्रीनमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. कोरोनाच्या संकटात अनेक उद्योगांवर कुऱ्हाड कोसळलेली असताना त्यात मोटर्स क्षेत्राचाही समावेश आहे, मात्र काही गाड्यांना जबरदस्त मागणी आहे, असं समोर आलंय. निस्सानची मॅग्नाईट नुकतीच भारतीय बाजारात दाखल झाली असून या कारनं भारतीय बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

आकर्षक लूक आणि भक्कम इंजिन पॉवर असलेली एसयूव्ही आणि काॅम्पॅक्ट एसयूव्ही कारला ग्राहकांची चांगलीच पसंती लाभलेली आहे. त्यामुळे या कारला भारतीय कारप्रेमींची मागणी आणि या गाडीच्या डिझाईनचा विचार करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे.  निस्सान कंपनीने 3 डिसेंबर रोजी मॅग्नाईट ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती.

ही कार भारतीयांनी चांगलीच पसंत केली आहे. अलीकडेच कंपनीने जाहीर केले की निसान मॅग्नाईट या गाडीने पहिल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 15 हजार बूकिंग मिळवल्या. तसेच प्रचंड लोकांनी ही गाडी पाहिली असून ते खरेदी करण्याच्या मनस्थितीत आहेत.  ग्राहकांमध्ये आता या गाडीची क्रेझ खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. निसान मॅग्नाईट या गाडीची ही कमालच म्हणावी लागेल.

आता अशी माहिती समोर आली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की निसान मॅग्नाईट कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे.  भारतीय बाजारात निसान मॅग्नाईटला जोरदार मागणी असल्याचं यावरुन दिसत आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आताच्या जास्त गर्दी व वेगाने वाहनाऱ्या रस्त्यावर वाहणे चालवणे धोकादायक ठरत आहे. अशा परिस्थितीत ही कार एक उत्तम पर्याय असल्याने लोकांचा ओढा तिच्याकडे असल्याचं दिसतंय.

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे.  ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल.  मॅग्नाईटचे इंजीन 1.0 लीटर पेट्रोल असून 18.75 किलोमीटर प्रतिलिटर मायलेजचा दावा कंपनीनं केला आहे. 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते.  भारतात या गाडीची 4.99 लाख रुपये सुरुवातीची किंमत ठेवण्यात आली आहे.

कंपनीने केवळ 11,000 रुपयांमध्ये या गाडीच्या बुकिंगची सुविधा देखील सुरु केली आहे. निसान मॅग्नाईट ही भारतात सर्वात कमी किंमतीत मिळणारी SUV कार बनली आहे. जानेवारीमध्ये या कारची किंमत वाढू शकते असं ही सांगण्यात आले होते.  निसान मॅग्नाइट एसयूव्हीच्या टॉप मॉडेलची किंमत 9.35 लाख रुपये आहे.

निसान मॅग्नाईट मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, ह्युंदाई वेन्यू, टाटा नेक्सॉन, फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा एक्सयूव्ही 300, टोयोटा अर्बन क्रुझर आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट या कारशी थेट टक्कर होत आहे.  कारण या गाड्यांच्या तुलनेत निसान मॅग्नाइटची किंमत कमी आहे. स्वस्तःत मस्त कार हवी असल्यास या कारचा नक्की विचार करा.

महत्त्वाच्या बातम्या-